सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मांडगाव येथे विनापरवाना देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारूच्या ४० बाटल्या आणि एक दुचाकी, असा एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१० वाजता ही कारवाई करण्यात आली. देविदास हिरामन सूरे, अंकुश काळे आणि कडूनाथ महाजन (तिघे रा. मांडगाव, ता. सिल्लोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी माहितीनुसार, दिलेल्या संबंधितांकडे विक्रीच्या उद्देशाने देशी दारूच्या १८० मिलिलिटर क्षमतेच्या भिंगरी संत्रा ब्रँडच्या ४० बाटल्या आढळल्या. या दारूची किंमत चार हजार रुपये असून, दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी टीव्हीएस स्टार सिटी दुचाकी (एमएच २० सीए ६८४७) किंमत ४० हजार रुपये, असा एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोहेका हरिदास आहेर यांनी ही कार्यवाही केली.














